Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना मिळणार ३ मोफत सिलिंडर प्रतिवर्षी?

Spread the love

Mukhyamantri Annapurna Yojana: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील गरजू कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही योजना सर्वांसाठी लागू नाही. या योजनेच्या काही नियम व अटी आहेत. राज्यातील ५६ लाख १६ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana

अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज बजेट सादर केले. या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी या बजेटमध्ये विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातच घरेलू गॅस सिलिंडर देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. राज्यात गॅस सिलिंडरच्या किमतीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. दरम्यान, राज्य सरकारने काही कुटुंबांना दरवर्षी ३ घरेलू गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

Mukhyamantri Annapurna Yojana: या महिलांना मिळणार ३ मोफत सिलिंडर प्रतिवर्षी

अजित पवार यांनी केलेली ही घोषणा राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठीच केली आहे. घरातील स्वयंपाकघराचा खर्च महिलांकडेच असतो. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यास महिलांना ताण येतो. खर्च वाढल्यामुळे महिलांना पैशांचे नियोजन काटकसरीने करावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने ५६ लाख १६ हजार महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना जाहीर केली आहे. बीपीएल रेशन कार्डधारक महिलांना म्हणजेच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना दरवर्षी ३ सिलिंडरचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. या माध्यमातून राज्यातील ५६ लाख १६ हजार महिलांना थेट लाभ होणार आहे.

महिलांसाठी बजेटमध्ये कोणत्या घोषणा?

‘लेक लाडकी’ योजना

२०२३-२४ पासून सुरू होणारी ‘लेक लाडकी’ योजना अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या अठरा वर्षांपर्यंत एकूण रक्कम.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’

२१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १.५ हजार रुपये – दरवर्षी अंदाजे ४६ हजार कोटी रुपये.

नोंदणी अनिवार्य

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे नाव सरकारी कागदपत्रांत प्रथम नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने नोंदवणे अनिवार्य.

पिंक ई-रिक्षा

१७ शहरांमधील १०,००० महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाहाय्य – ८० कोटी रुपये निधी.

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना दिल्या जाणाऱ्या अनुदानात १०,००० रुपयांपासून २५,००० रुपयांपर्यंत वाढ.

कर्करोग तपासणीसाठी उपकरणे

राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य – ७८ कोटी रुपये.

मोफत रुग्णवाहिका सेवा

गरोदर माता व मुलांना आरोग्य संस्थांमध्ये मोफत वाहतुकीसाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका.

जल जीवन मिशन कार्यक्रम

ग्रामीण भागातील १ कोटी २५ लाख ६६ हजार ९८६ घरांना जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जोडले गेले आहे – उर्वरित २१ लाख ४ हजार ९३२ घरांचे काम प्रगतीपथावर आहे.

‘लखपती दीदी’

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ७ लाख नवीन गट स्थापन करणे – बचत गटांच्या फिरत्या निधीची रक्कम १५ हजारांवरून ३० हजारांपर्यंत वाढवणे.

‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म’

महिला स्वयं-सहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म’ च्या माध्यमातून १५ लाख महिला ‘लखपती दीदी’ – यावर्षी २५ लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’

महिला लघु उद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ – राज्यात अखिल भारतीय स्तरावर संमेलन आयोजित.

‘आई योजना’

पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना १५ लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा – १० हजार रोजगार निर्मिती.

मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणासाठी – मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांच्या मुलींना वार्षिक कुटुंब उत्पन्न २ लाख रुपयांपर्यंतच्या मुलींसाठी १००% ट्यूशन फी आणि परीक्षा फी परतावा.

फायदा

या निर्णयामुळे अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ होणार – अंदाजे २ हजार कोटी रुपयांचा भार.

Registration Link – https://mahafood.gov.in/

Other Updates – https://freejobcloud.com/

Leave a Comment